Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधान
Pat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
Pat Cummins: आयपीएलमध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेर आरसीबीला यंदाच्या सिझनमध्ये दुसरा विजय मिळवणं शक्य झालं आहे. लागोपाठ 4 विजयानंतर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने सनरायर्झ हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
पराभवानंतर काय म्हणाला पॅट कमिंस
आरसीबीने 35 रन्सने हैदराबादला त्यांच्यात घरात मात दिली. यंदाच्या सिझनमधील हैदराबादचा हा तिसरा पराभव होता. यावेळी पॅट कमिंस म्हणाला की, आमच्यासाठी आजचा दिवस काही चांगला नव्हता. आमच्या संपूर्ण डावामध्ये बॉल योग्यरित्या येत नव्हता, परिणामी आम्ही काही विकेट्स गमावल्या. आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार होतो. मला असं वाटतं आमच्यासाठी तीच गोष्ट फायदेशीर ठरतेय. काही सामन्यांपूर्वी आम्ही विचार करत होतो की, आमची टीम प्रथम गोलंदाजी करणारी आहे. मात्र टीममधील खेळाडू चांगलं काम करताना दिसतायत.
कमिंस पुढे म्हणाला की, हे टी-20 क्रिकेट आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. त्यामुळे याकडे जास्त लक्ष देऊ नका. एक किंवा दोन गेममध्ये जिथे गोष्टी सुरुवातीला आमच्या वाट्याला आल्या नाहीत. तरीही आम्ही चांगला स्कोर गाठण्यात यशस्वी ठरलो.
आरसीबीकडून हैदराबादचा पराभव
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमवून 206 रन्स केले होते. यावेळी हैदराबादला विजयासाठी 207 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. फलंदाजांना यावेळी साजेशी कामगिरी करता आली नाही. मोक्याच्या क्षणी विकेट गमवल्याने सामन्यावर बंगळुरुने नियंत्रण मिळवलं. सनरायझर्स हैदराबादच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावून 171 रन्स करता आले.