मुंबई : भारतीय स्पिनर हरभजन सिंह म्हणतो की,'मला नाही वाटतं की, माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी पुन्हा टीम इंडियासाठी खेळेल.' गुरूवारी हरभजनने वनडे टीमचा उपकॅप्टन रोहित शर्मासोबत इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करताना या गोष्टीचा खुलासा केला. या लाईव्ह चॅटमध्ये एका चाहत्याने धोनीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचं उत्तर देताना हरभजन म्हणतो की, मी जेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पमध्ये होते. तेव्हा मला लोकांनी धोनीच्या खेळाबद्दल विचारलं. तेव्हा माझं उत्तर एकच होतं की, हा निर्णय सर्वस्वी धोनीचा असणार आहे. मात्र मी जेवढं धोनीला ओळखतो, धोनी पुन्हा टीम इंडियाची जर्सी घालू इच्छित नाही. तो आयपीएल नक्की खेळेल. मला वाटतं २०१९ चा वर्ल्ड कप हा भारतीय संघासोबत धोनीची शेवटची टूर्नामेंट होती. 


३८ वर्षांचा धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचा शेवटचा सामना हा न्यूझीलंड विरूद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये झाला होता. ज्यामध्ये भारताच्या पदरी निराशा होती. बीसीसीआयने या वर्षाच्या सुरूवातीलाच जाहिर केलेल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये सहभागी करून घेतलेलं नाही. यानंतर त्याच्या सन्यासाबाबत चर्चा झाली होती. 


मात्र धोनी या सगळ्यावर काहीच बोललेला नाही. तो लॉकडाऊनच्या अगोदर आयपीएलची तयारी करण्यासाठी चेन्नईत होता. मात्र कोरोनाव्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आलं आहे. लवकरच धोनी आपल्याला मैदानात दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.