मुंबई : क्रिकेटचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण काही चाहते हे लक्षात ठेवण्यासारखे असतात. कारण त्यांनी जे केलेलं असतं ते सगळेच करत नाही. अशाच एका क्रिकेट फॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे वयाच्या 91 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाचे डग क्रोवेल (Doug Crowell) यांनी हा कारनामा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंसाठी स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत डग क्रोएल 15 वर्षांपासून खेळत आहे. डग क्रोएल यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, 'ही लीग अशा लोकांसाठी आहे जे लोक वयाच्या 30 व्या वर्षी किंवा या दरम्यान क्रिकेट कारकीर्द सोडून जातात. त्यांना खेळायचं असतं. ते स्वत: ला तंदुरुस्त ठेवतात.


डग क्रोएल म्हणाले की, 'मी असे म्हणतो की काही वर्षे मला अजून खेळवू शकता. मी अजूनही तंदुरुस्त आहे आणि मी स्वत:चा आनंद घेत आहे आणि जेव्हा जेव्हा मला निवडले जाते तेव्हा मी मनाने खेळायला जात आहे.'



डग क्रोएल पुढे म्हणाले की, 'आम्ही अवघड परिस्थितीत क्रिकेट खेळणं शिकलो. पण यामुळे कोणाला त्रास नाही झाला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अजूनही खेळत आहे. कारण त्यावेळी आमच्याकडे चांगले मैदान किंवा पिच नव्हत्या. मैदान व्यवस्थित करण्यासाठी उपकरणं देखील नव्हती.'