Babar Azam : गुरुवारी एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान ( Pakistan vs Sri Lanka ) यांच्यात सामन्यात रंगला होता. या सामन्यामध्ये विजय मिळवत श्रीलंकेने फायनल सामन्यामध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 42 ओव्हर्सचा ठेवण्यात आला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 252 रन्स केले होते. यावेळी श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून विजय मिळवला. दरम्यान या पराभवामुळे पाकिस्तानचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये बाबर आझमला ( Babar Azam ) अश्रू अनावर झाल्याचा दावा करण्यात येतोय. 


पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वास रोखून धरलेल्या या या सामन्यात श्रीलंकेच्या टीमने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. चारिथ असलंकाने शेवटच्या बॉलवर 2 रन्स घेत श्रीलंकेच्या टीमला ( Sri Lanka Team ) अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलंय. असलंका 49 रन्सवर नाबाद राहिला. टीमचे दोन्ही ओपनर फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यावेळी कुसल परेरा (17) आणि पथुम निसांका (29) रन्स करून बाद झाले. कर्णधार दासुन शनाकाही साजेसा खेळ करता आला नाही. 


हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 42 ओव्हर्समध्ये 252 रन्सची गरज होती. कुसल मेंडिसने टीमसाठी उत्कृष्ट खेळी खेळली. 87 बॉल्समध्ये त्याने 8 फोर आणि 1 सिक्ससह 91 रन्स केले. शेवटच्या बॉलपर्यंत लढत 49 रन्स करत चारिथ असलंकाने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद 3 आणि शाहीन आफ्रिदी 2 तर विकेट्स घेण्यात यश आलं.


बाबर आझमचा व्हिडीओ होतोय व्हायरल


दरम्यान यंदाच्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या टीमचा खेळ चांगला झाला होता. टीम इंडियाविरूद्ध मात्र त्यांना चांगला खेळ करता आला नाही. यावेळी भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये येणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला. यानंतर सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमचे ( Babar Azam )  डोळे पाणावलेले असल्याचं दिसून येतंय. 



39 वर्षांनंतरही चाहत्यांचं स्वप्न राहिलं अपूर्ण


एशिया कप 1984 पासून आयोजित केला जा असून यंदाचा एशिया कपचा सिझन हा 16 वा असून आतापर्यंत 13 सिझनमध्ये सामने वनडे स्वरूपात खेळले गेले आहेत. मात्र आतापर्यंत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ( India-Pakistan ) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले नाहीत. त्यामुळे यंदा चाहत्यांना भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणारी फायनल पाहण्याची इच्छा होती. भारत-पाकिस्तान टीम अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी यंदा दावेदार मानले जात होती. मात्र गुरुवारी श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवाने पाकिस्तानचं फायनल गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या दाव्यावर आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)