कोलकाता : भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला वेगळे वळण मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यातून DRS मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. चौथ्या दिवसाचा सामना सुरू असताना हा वाद झालेला आहे. श्रीलंकेचा फलंदाज दिलरूवानद परेरा बाद झाल्यावर त्याने रिव्ह्यूची मागणी केली. त्यानंतर त्याच्यावर असा आरोप करण्यात आला की, त्याने ड्रेसिंग रूममधून इशारा मिळाल्यानंतर रिव्ह्यूची मागणी केली. त्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. मात्र या संदर्भात अद्याप भारतीय कर्णधार किंवा बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 


काय आहे हा वाद? 


ही घटना श्रीलंकेच्या पहिल्या इनिंगच्या ५७ व्या ओव्हरमध्ये घडली.  या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये शमीने दिलरूवान परेराला एलबीडब्ल्यू करून आऊटची मागणी केली. आणि अंपायर नाइलेज लॉग्नने आऊटचा इशारा दिला. यानंतर परेराने क्रीजच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या रंगना हेराथकडे पाहिलं. मात्र त्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे तो तंबूत जाऊ लागला. मात्र थोडं पुढे गेल्यावर तो पुन्हा मागे वळला आणि त्याने रिव्ह्यूची मागणी केली. 


परेराने तंबूत जाताना ड्रेसिंग रूमकडे पाहिलं होतं आणि तिथूनच त्याला रिव्ह्यूचा इशारा मिळाला. आणि याच मुद्याला घेऊन हा वाद सुरू झाला आहे. वाद झाल्यानंतर श्रीलंका बोर्डाकडून परेराचा बचाव करताना सांगितले की, त्यावेळी त्याला ड्रेसिंग रूममधून कोणताही इशारा मिळालेला नाही. त्यावेळी परेरा गोंधळला होता की रेफरल किती वेळात घेऊ शकतो? आणि यामुळे तो पुढे जाऊन पुन्हा मागे आला. टीव्ही रिप्ले झाला तेव्हा त्यामध्ये दिसलं की बॉल त्यावेळ ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या बाजूला जात होती. ज्यावेळी थर्ड अंपायरने फील्ड अंपायरच्या निर्णयाला चुकीचं ठरवत परेराला नॉटआऊट सांगितलं.