Duleep Trophy : शुभमन गिल ते श्रेयस अय्यर, दुलीप ट्रॉफीमध्ये धमाका करणार `हे` स्टार क्रिकेटर्स, कधी कुठे पाहाल सामने?
रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
Duleep Trophy 2024-25 : भारताची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी 2024-25 ला गुरुवार 5 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा देशातील दोन शहरांमध्ये खेळवली जाणार असून यंदा या स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार खेळाडू सुद्धा खेळताना दिसतील. रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांवर भारतीय टीमच्या निवड समितीचीही नजर राहील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती आगामी बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टेस्ट आणि टी 20 सीरिजसाठी दुलीप ट्रॉफीमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकते. बंगळुरू आणि आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये खेळले जातील. झोनच्या आधारावर या स्पर्धेमध्ये यापूर्वी एकूण सहा संघ सहभागी होत होते मात्र यंदा या स्पर्धेत इंडिया ए, बी, सी आणि डी असे चार संघ खेळतील. सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे स्टार क्रिकेटर्स सुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार होते मात्र दुखापतीच्या कारणामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सिरीजनंतर काहीकाळ विश्रांती दिली असून ते देखील दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेणार नाहीत.
कधी, कुठे पाहाल सामने?
दुलीप ट्रॉफीचे यंदा 61वे वर्ष असून पहिल्या दिवशी दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना सकाळी 9 : 30 वाजता टीम ए विरुद्ध टीम बी यांच्यात बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होईल तर दुसरा सामना हा अनंतपुर येथील स्टेडियमवर टीम सी विरुद्ध टीम डी यांच्यात होईल. अर्धातास आधी म्हणजेच 9 वाजता हा दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. या सामान्याचे लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क च्या चॅनेलवर होईल तर मोबाईल यूजर्स दुलीप ट्रॉफीचे सामने जीओ सिनेमावर फ्री मध्ये पाहू शकतात.
हेही वाचा : मंद, माकड म्हणून हिणवलं, आता पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत रचला इतिहास... कोण आहे दीप्ती?
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ :
टीम अ: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.
टीम ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन.
टीम क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे, संदीप वारियर.
टीम ड : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.