Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी 2024 ची घोषणा केली असून याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी  टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुलीप ट्रॉफी 2024- 25 ही 5 सप्टेंबर 2024 रोजी अनंतपूर, आंध्र प्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवली जाईल. बीसीसीआयने दुलीप  ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चार संघांची घोषणा केली असून यात शुभमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, अक्षर पटेल इत्यादी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी टीम ए च्या कर्णधार पदाची जबाबदारी शुभमन गिल, टीम ब च्या कर्णधार पदाची जबाबदारी अभिमन्यू ईश्वरन, टीम सी च्या कर्णधार पदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड तर  टीम डी च्या कर्णधार पदाची जबाबदारी  श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे. 


हेही वाचा : 'मेडल 15 - 15 रुपयात विकत घ्या....' Vinesh Phogat ची याचिका फेटाळल्यावर बजरंग पुनियाची पोस्ट व्हायरल


 


स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ : 


टीम अ: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.


टीम ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन. 


टीम क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे, संदीप वारियर.


टीम ड : श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.

भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सिरीज : 


19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. या सीरिजसाठी अद्याप टीम इंडियाचा संघ जाहीर झालेला नाही. तेव्हा बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीच्या संघांची घोषणा करत असताना सांगितले की ज्या खेळाडूंचा बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात समावेश होईल त्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफीच्या संघातून रिप्लेस केलं जाईल. 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार असून  दुसरी टेस्ट ही 27 सप्टेम्बर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारत आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची टी 20 सिरीज सुद्धा खेळवली जाईल.