कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावावर करण्यात आली. यादरम्यान श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावून इतिहास रचला. अय्यरने 13 चौकार आणि दोन सिक्ससह 105 धावांची उत्तम खेळी खेळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म यावेळी स्टँडवर उपस्थित असलेले फॅन्स 'दस रुपये पेप्सी... अय्यर भाई सेक्सी' अशा घोषणा देत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 



श्रेयस अय्यर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 16वा भारतीय ठरला आहे. देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिलं शतक झळकावण्याचा विशेष विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर आहे. 1993 मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध ही खास कामगिरी केली होती. त्या सामन्यात लाला अमरनाथ 118 रन्स केले होते.


अय्यरने पहिल्या कसोटीत ठोकलं शतक


श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यात तो टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सामील होणार आहे. 


श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यामुळे आता खराब फॉर्ममुळे टीम इंडियाबाहेर जाण्याच्या जवळ असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी श्रेयस अय्यरने या खेळीने धोका निर्माण केला आहे.