समलैंगिंक संबंध ठेवल्यास घरातून हाकलून देऊ, धावपटू दुती चंदला बहिणीची धमकी
भारताची धावपटू दुती चंदच्या समलैंगिंक संबंधावर तिच्या बहिणीने नाराजी
मुंबई : भारताची धावपटू दुती चंदच्या समलैंगिंक संबंधावर तिच्या बहिणीने नाराजी व्यक्त केली आहे. जर तू समलैगिंक संबंधात राहिलीस तर तुला घरातून हाकलून लावू, इतकंच नाही तर तुरुंगाची हवा देखील खायला लावू अशी धमकी बहिणीने दिल्याची माहिती द्युती चंदने दिली.
माझ्या बहिणीने याआधी आमच्या भावाला देखील घराबाहेर काढले आहे. भावाची बायको आवडली नसल्याने तीने माझ्या भावाला बाहेर काढले. आता मला घराबाहेर काढायची धमकी दिली आहे. मी वयाने मोठी आहे. माझ्या आयुष्यातील योग्य निर्णय घेण्या इतपत मला जाण आहे. मी योग्य निर्णय घेण्याची समज आहे. म्हणूनच मी माझ्या समलैंगिक संबंधांबद्दल वाच्यता केली.
दुतीनं काही दिवसांपूर्वी आपण समलैंगिंक संबंधांमध्ये असून आपल्याला आयुष्याची साथादीर गवसल्याचं म्हटलं. ओडिशाची धावपटू असलेल्या दुतीनं आपल्या पार्टनरच्या मताचा आदर राखत तिची ओळख उघड करण्यास मात्र नकार दिला आहे.
दुती म्हणाली, 'माझ्या गावात राहणाऱ्या १९ वर्षांच्या मुलीवर मागच्या ५ वर्षांपासून माझं नातं आहे. मी जेव्हा घरी येते तेव्हा तिच्यासोबत वेळ घालवते. ती माझ्यासाठी आयुष्याच्या जोडीदारासारखी आहे. भविष्यात तिच्यासोबत संसार करण्याची माझी इच्छा आहे.'
प्रत्येकाला नात निवडण्याच स्वांत्र्य असायला हवं. समलैगिंक संबंधांमध्ये असलेल्यांच्या अधिकारासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. मला माझ्या होणाऱ्या पार्टनरसोबत राहायला आवडेल.
असेही द्युती म्हणाली.
समलैगिंक संबंधांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम बद्दल मोठा निर्णय दिला. मला आयुष्यभर साथ देणारा साथीदार मिळावा, असे माझे स्वप्न होते. मला माझ्या प्रोफेशनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी नेहमीच प्रेरणा देईल. मला कोणाच्यातरी सहवासाची गरज असल्याचे द्युती म्हणाली. दुतीच्या नावावर १०० मीटर रेस ११.२४ सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड आहे.