Dwayne Bravo Retirement : वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आणि ऑलराऊंडर ड्वेन ब्रावो याने फ्रँचायझी ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ड्वेन ब्रावो याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. कॅरिबियन प्रिमियर लीग आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा असेल, असं देखील ड्वेन ब्रावोने जाहीर केलं. आयपीएल ऑक्शनआधी ड्वेन ब्रावोने निवृत्ती जाहीर केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तुम्हाला माहिती नसेल तर ड्वेन ब्रावो याने 2023 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता त्याने  फ्रँचायझी ट्वेंटी-20 क्रिकेटला देखील रामराम ठोकलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राव्होने 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच युएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ब्राव्होच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला होता. त्याची जागा अजूनही भरता आली नाहीये. ड्वेन ब्राव्हो हा कॅरेबियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ब्राव्होनं सीपीएलच्या 103 सामन्यात 128 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे त्याला आत्तापर्यंत 5 सीपीएल ट्रॉफी जिंकता आल्यात.


टी 20 स्पेशालिस्ट अशी ड्वेन ब्रावोची ओळख आहे. ड्वेन ब्राव्हो हा कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केल्याने त्रिनबागो नाइट रायडर्सला मोठा झटका बसला आहे. 


काय म्हणाला Dwayne Bravo?


आत्तापर्यंत प्रवास खूप सुंदर होताय. पण सीपीएल 2024 हा माझा शेवटचा हंगाम असेल. मला माझी शेवटची व्यावसायिक स्पर्धा त्याच्या कॅरेबियन चाहत्यांसमोर खेळायची आहे. सीपीएलचा प्रवास त्रिनबागो नाईट रायडर्सपासून सुरु झाला होता आणि आता त्रिनबागो नाइट रायडर्स या संघासह प्रवास संपवायचा आहे, असं ड्वेन ब्रावोने म्हटलं आहे.



डीजे ब्रावोची कमाल


ड्वेन ब्रावो टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडी मानला जातो. टी 20 मध्ये 500 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू आहे. आपल्या ऑलराऊड कामगिरीने त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी देखील सर्वोत्तम कामगिरी केली अन् चेन्नईला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या. ब्राव्होनं टी 20 मध्ये आतापर्यंत 630 विकेट घेतल्या आहेत. तसंच फलंदाजीत 6970 धावाही केल्या आहेत. त्यामुळे डीजे ब्रावोला टी-ट्वेंटी सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.