कोलकाता : भारतात आज प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळली जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज दुपारी भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये पिंक टेस्टला सुरवात होईल. पिंक टेस्टसाठी सारं कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघालय. टीम इंडियामध्येही पहिल्या-वहिल्या पिंक टेस्टसाठी प्रचंड एक्साईटमेंट निर्माण झालीय. दोन्ही टीम्स प्रथमच पिंक बॉलनं खेळनं दोन्हीसमोर आव्हान असणार आहेत. दरम्यान ऐतिहासिक क्षणांची नोंद करण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचं विराटनं म्हटलं आहे. तर बांगलादेशच्या कॅप्टननं या टेस्टकडे आम्ही अनुभव म्हणून पाहात असल्याचं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) चे अध्यक्ष सौरव गांगुली या सामन्यासाठी उत्सूक आहेत. या ऐतिहासिक सामन्यासाठी त्यांनी ही विशेष लक्ष घातलं आहे. गांगुली यांनी याची संपूर्ण जबाबदारी घेतली असून प्रत्येक गोष्टीवर त्यांनी बारीक नजर आहे.


ऐतिहासिक सामन्याची सुरुवात पॅराट्रूपर्स ईडन गार्डन्समधून उतरण्यापासून होईल. दोन्ही कर्णधारांना गुलाबी बॉल देण्यात येईल. यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ईडन गार्डनवर घंटा वाजवत सामन्याची सुरुवात करतील.


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्यासह पंतप्रधान शेख हसीना आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मैदानावर येतील आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपल्य़ा टीमची ओळख त्यांना करुन देतील.