Ellyse Perry : भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind VS aus) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या रोमांचक सेमीफायनल सामन्यात काँगारूंनी भारताचा पराभव केलाय. सामन्यात ऑस्ट्रेलियाची फिल्डिंग (Fielding) भन्नाट राहिली. त्यात सर्वात खास ठरली ती, एलिस पैरी (Ellyse Perry)... या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अपूरंच राहिल्याचं पहायला मिळतंय. (ellyse perry fielding video like jonty rhodes india vs austrelia women t20 world cup marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनल सामन्यात (SemiFinal) ऑस्ट्रेलियाने एक एक रन वाचला आणि सामना खिश्यात घातला. त्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय राहिला आहे. हा व्हिडिओ पाहून जॉन्टी रॉड्सच्या (jonty rods) फिल्डिंगची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.


आणखी वाचा - INDW vs AUSW: भाग यहां से @#@#...; कॅचनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूला Shefali Verma कडून शिवीगाळ


एलिस पैरी (Ellyse Perry) ची भन्नाट फिल्डिंग - 


भारताला 9 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने धुंवाधार फलंदाजी सुरू केली. मात्र, ऑस्ट्रेलियाने एका एका बॉलचं गणित तयार ठेवलं होतं. त्याचवेळी एलिस पैरी (Ellyse Perry) ची धमाकेदार फिल्डिंग पहायला मिळाली. त्याचा व्हिडिओ आयसीसीने (ICC) शेअर केला आहे.


पाहा Video - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, संपूर्ण पॉवरप्लेमध्ये भारताच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात यश काढता आली नाही. पहिली विकेट भारताला आठव्या ओव्हरमध्ये मिळाली, त्यामुळे त्याचा फटका भारताला सामन्याच्या निकालात बसला. सेमीफायनलचा सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागल्याने वर्ल्ड कपमधील (t20 women world cup) आव्हान संपुष्टात आलं आहे.


हरमनप्रीतची कडवी झुंज व्यर्थ (Harmanpreet Kaur)


हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सेमीफायनलच्या सामन्यात कॅन्टन इनिंग खेळली. कौरने 34 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. जेमिमाने हरमनप्रीतला चांगली साथ दिली होती. मात्र टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही.