INDW vs AUSW: भारतीय महिला क्रिकेट टीमची (Womens team India) ओपनर फलंदाज शेफाली वर्मा (Shefali Verma) तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जातो. टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये (Ind vs Aus Semifinal) मात्र तिचा एक वेगा रंग चाहत्यांना पहायला मिळाला. केपटाऊनमध्ये गुरुवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (INDW vs AUSW) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. या सामन्यात कॅच घेतल्यावर शेफालीने ऑस्ट्रेलिया खेळाडूला शिवीगाळ केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी टीम इंडियाची चांगलीच धुलाई केली. 20 ओव्हरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 172 रन्सचा स्कोर केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंजांनी चांगली खेळी केली असून बेथ मूनीने अर्धशतक झळकावलं. यावेळी 11.5 व्या ओव्हरमध्ये शेफालीने तिचा उत्तम कॅच घेतला आणि कती आऊट झाली. यावेळी शेफालीने तिला शिवीगाळ केली आणि मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितलं.
11.5 व्या ओव्हरमध्ये शेफालीने कॅच घेतल्याने बेथ मूनीला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. मात्र 10.4 ओव्हरला तिने एक सोप कॅच ड्रॉप केला होता. मिड ऑफला असलेला हा कॅच बेथचाच होता. मात्र शेफाली तो पकडू शकली नव्हती. अखेर बेथने तिने अजून एक संधी दिली आणि वर्माने तिला माघारी धाडलं. यावेळी तिने बेथला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
कितना पारिवारिक माहौल है pic.twitter.com/Z7sxuziBbL
— MohiCric (@MohitKu38157375) February 23, 2023
टीम इंडियाची प्लेईंग 11
शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह
ऑस्ट्रेलिया प्लेईंग 11
एलिसा हीली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एश्ले गार्डनर, एलिस पेरी, ताहली मॅक्ग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, जेस जोनासेन, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन