दुबई : टी -20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचे एक लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. पाकिस्तानने आपल्या टी -20 विश्वचषक जर्सीवरील स्पर्धेच्या लोगोमधून भारताचे नाव काढून टाकले आहे. भारत 2021 टी 20 विश्वचषक होस्ट करत आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ते यूएईमध्ये हलवण्यात आले आहे.


पाकिस्तान संघाच लाजास्पद कृत्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत या स्पर्धेचे खरे यजमान आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने जगासमोर लाजीरवाण कृत्य केलं आहे. अलीकडेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी त्यांच्या जर्सी शेअर केली आहे. यजमान देश भारताचे नाव न लिहून पाकिस्तानने या जर्सीवर यूएई लिहिले आहे.



नियमानुसार भारताचं नाव असणं गरजेचं आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना यजमान देशाचे नाव आणि वर्ष त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूस स्पर्धेच्या नावासह लिहिणे आवश्यक आहे. या अर्थाने, 'आयसीसी पुरुषांचा टी 20 विश्वचषक भारत 2021' इथे लिहायचा होता, पण पाकिस्तानने भारताऐवजी येथे यूएई लिहिले आहे.



ICICI करणार कारवाई


पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे आपली विश्वचषक जर्सी प्रदर्शित केली नाही. पण जर तीच जर्सी दाखवली तर बीसीसीआय आणि आयसीसी त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. आगामी टी -20 विश्वचषकासाठी पाकिस्तानची जर्सी अनधिकृतपणे सोशल मीडियावर प्रदर्शित केली जात आहे. त्यावर भारताऐवजी यूएई लिहिलेले आहे.


पाकिस्तानच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा 


पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा तीव्र होत आहेत. सुपर 12 सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळ यासंदर्भात अधिकृत कारवाई करते की बदल करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येतील. 2 वर्षांनंतर दोघे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येतील.