IND VS PAK Emerging Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना म्हटलं कि रोमांच आणि राडे पाहायला मिळतातच. एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये संघर्ष सुरु आहे तिथे दोन्ही देशांचे संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळत आहेत. शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यात इंडिया ए संघाने पाकिस्तान ए संघाला हरवून इमर्जिंग एशिया कपमध्ये जबरदस्त सुरुवात केली. यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी गोलंदाज सूफयान मुकीम यांच्यात वाद झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमानची राजधानी मस्कत येथे 18 ऑक्टोबर पासून इमर्जिंग आशिया कप 2024 या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यात प्रत्येक देशाच्या ए संघांनी सहभाग घेतला असून 19 ऑक्टोबर रोजी भारत - पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. तिलक वर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टॉस जिंकून पहिले बॅटिंगसाठी मैदानात उतरली. टीम इंडियाची सलामी जोडी प्रभसिमरन सिंह आणि अभिषेक शर्मा यादोघांनी धडाकेबाज सुरुवात केली आणि पावरप्लेमध्ये 68 धावा केल्या. दोघांनी आपल्या जबरदस्त फलंदाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. 


अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये झाला वाद : 


अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी स्पिनर सूफयान मुकीम यांच्यात सामन्याच्या 7 व्या ओव्हर दरम्यान वाद झाला. यावेळी पाकिस्तानी स्पिनर सूफयान मुकीमने टाकलेल्या बॉलवर अभिषेक शर्मा योग्य टायमिंगने शॉट खेळू शकला नाही आणि फिल्डरने त्याचा कॅच पकडला. अभिषेक शर्मा आउट झाल्यावर पाकिस्तानी स्पिनर सूफयान मुकीम याने तोंडावर बोट ठेवले आणि गप्प बसण्याचा इशारा आणि मग त्याने अभिषेकला शिवी दिली. यानंतर अभिषेक रागाने लाल होऊन पाकिस्तानी गोलंदाजाला उत्तर देण्यासाठी त्याच्या जवळ जात होता तेवढ्यात अंपायरने आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली आणि दोघांना एकमेकांपासून दूर केले. प्रभसिमरनने अभिषेकला शांत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर पाकिस्तानच्या इतर खेळाडूंनी देखील आपल्या गोलंदाजाला समजावले. 


हेही वाचा : VIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर


 


पाहा व्हिडीओ : 



भारताने 7 धावांनी जिंकला सामना : 


भारताच्या ए संघाने पाकिस्तानच्या ए संघाला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ए संघ 7 विकेट्स गमावून 176 धावांच करू शकला. विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची अवस्था सुरुवातीला वाईट होती. 21 धावांवर त्यांनी 2 विकेट्स गमावल्या होत्या. पाकिस्तानकडून अराफात मिन्हासने 29 बॉलमध्ये सर्वाधिक 41 धावा केल्या. तर यासिर खानने 33 धावांची खेळी केली. भारताकडून शुल शिवाय रसिख सलाम आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.