India A vs Pakistan A Asia Cup Final: इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात (Emerging Teams Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ (IND A vs PAK A) आमने सामने आले आहेत. कोलंबो येथे खेळवल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 352 धावा केल्या. आता भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्याला निर्धारित 50 षटकांत 353 धावा कराव्या लागतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फंलादाजी करताना पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये आठ विकेट्सच्या बदल्यात 352 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 353 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. पाकिस्तानकडून तैयब ताहिरने सर्वाधिक 108 धावा केल्या. त्याने आक्रमक खेळी करत धमाकेदार शतक ठोकलं. साहिबजादा फरहानने 65 आणि सॅम अयुबने 59 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचबरोबर हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.




रियान परागने पाकिस्तानविरुद्ध घातक गोलंदाजी केली. त्याने 28 व्या षटकात दोन चेंडूत दोन बळी घेत कहर केला. रियान परागने पहिल्याच चेंडूवर ओमेर युसूफला बाद केलं. युसूफ 35 चेंडूत 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पुढच्याच चेंडूवर रियानने कासिम अक्रमला बाद केलं. पहिल्या चेंडूवर खातं न उघडता अक्रमने हर्षित राणाकडे कॅचआऊट केलं.


पाहा दोन्ही संघ (IND A vs PAK A) 


Pakistan A Squad


सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हरीस (C & WK), मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर, अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.


India A Squad


साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (C), रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (WK), मानव सुथार, हर्षित राणा, राजवर्धन हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया.