Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियात या स्टार खेळाडूचं 11 महिन्यांनी कमबॅक
टीम इंडियात इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून स्टार ऑलराऊंडर खेळाडूचं जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन झालं आहे.
लंडन : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Eng vs Ind, 1st Odi) टॉस जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात या पहिल्या सामन्यातून स्टार ऑलराऊंडर खेळाडूचं जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. हार्दिक पंड्याचं कमबॅक झालंय. त्यामुळे टीम इंडियाला हार्दिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (eng vs ind 1st odi team india all rounder hardik pandya comeback in squad after more than 11 months)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.