लंडन : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 111 धांवांचं आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. (eng vs ind 1st odi team india beat england by 10 wicktes captain rohit sharma and jasprit bumrah shine)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 76 धावांची खेळी केली. यामध्ये रोहितने 6 चौकार आणि 5 खणखणीत सिक्स ठोकले. तर शिखर धवनने 54 बॉलमध्ये 31 धावांची संयमी खेळी करत रोहितला चांगली साथ दिली.


त्याआधी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे बुमराहने 6 पैकी 3 फलंदाजांना शून्यावर बाद केलं.


तर मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी बुमराहला दिलेल्या साथमुळे इंग्लंडला लवकर आटोपण्यात यश आलं. 


दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 14 जुलैला खेळवण्यात येणार आहे. हा दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. 


तर दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळूवन मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न इंग्लंडचा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण वरचढ ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा. 


टीम इंग्लंड:


जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, डेविड विले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स आणि रीस टॉपले.