Eng vs Ind 1st ODI | टीम इंडियाने जिंकला टॉस, बॉलर्ससमोर तगडं आव्हान
इंग्लंड विरुद्ध आज पहिला वन डे सामना आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. वन डे वर्ल्ड कपसाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. वन डे सीरिजवरही कब्जा मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
मुंबई : इंग्लंड विरुद्ध आज पहिला वन डे सामना आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. वन डे वर्ल्ड कपसाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. वन डे सीरिजवरही कब्जा मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखण्याचं मोठं आव्हान बॉलर्ससमोर असणार आहे. विराट कोहली खेळणार नाही. दुखापतीमुळे तो टीममधून बाहेर आहे.
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माची नजर वन डे सीरिजकडे आहे. शिखर धवन आज रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीला दुखापत झाल्याने सध्या त्याला टीमबाहेर ठेवण्यात आलं आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली आहे. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुरला संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा दोन ऑलराउंडर असणार आहेत.
दुसरीकडे, इंग्लिश टीमला टी-20 सीरिजमध्ये पराभव स्वीकारावा लागला, त्याचा वचपा काढण्यासाठी खेळाडू तयारीत आहेत. इंग्लंडकडून मजबूत टीम मैदानात उतरणार आहे. यावेळी तगडे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर त्यांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.
2019 च्या वर्ल्ड कपनंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा इंग्लंड त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रूट, बटलर आणि स्टोक्स एकत्र मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहेत.