मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये  लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्पिनर युझवेंद्र चहलने इतिहास रचला आहे. या सामन्यात त्याने 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेतले. या उत्कृष्ट गोलंदाजीसह त्याने त्याच्या नावावर एक मोठा विक्रम 
केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या भेंदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ 246 धावावर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वांधिक 47 धावा केल्या. त्याच्यानंतर डेव्हिड विलीने 41 धावांचे योगदान दिले. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 38 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 33 धावा केल्या. या धावांच्या बळावर इंग्लंड संघ 246 धावा गाठू शकला. त्य़ामुळे भारतासमोर 247 धावांचे आव्हान असणार आहे.


वनडेत रचला इतिहास
युझवेंद्र चहलने लॉर्ड्सवर इतिहास रचला आहे. या सामन्यात त्याने 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेतले. यामध्ये त्याने जो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली अशा दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह चहल हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर चार विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत कोणत्या भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. ती कामगिरी आता चहलने करून दाखवली आहे.  


तसेच या सामन्यात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन आणि शमी आणि प्रसिद्द कृष्णाने 1 विकेट घेतली आहे.