बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे. रोहितने टी 20 मध्ये अनोख त्रिशतक पूर्ण केलं आहे. रोहितने या दुसऱ्या सामन्यात 31 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. रोहितने यासह मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले आहेत. (eng vs ind 2nd t20i team india captain rohit sharma become 1st and overall 2nd batsman who completed 300 fours in t20i career) 


रोहितचा धमाका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित टी 20 क्रिकेटमध्ये 300 चौकार ठोकणारा पहिला भारतीय आणि दुसराच फलंदाज ठरला आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील  आपल्या खेळीतील पहिला चौकार मारला. यासह रोहितने पहिला भारतीय होण्याचा मान पटकावला. रोहितने 127 व्या सामन्यात ही कामगिरी केली. 


टी 20  मध्ये सर्वाधिक चौकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे. स्टर्लिंगने आतापर्यंत 104 मॅचमध्ये 325 फोर लगावले आहेत. 


त्यानंतर आता रोहित 301 फोरसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटच्या नावावर 98 सामन्यात  298 चौकारांची नोंद आहे. त्यामुळे विराटही चौकारांच्या त्रिशतकांपासून अवघे दोन पाउल दूर आहे. 
 
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन आणि मॅथ्यू पार्किन्सन.