मुंबई :  पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला (Team India) इंग्लंडकडून दुसऱ्या वनडेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने (Eng vs Ind) टीम इंडियाला 100 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडने या विजायसह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह मालिका निकाली निघणार आहे. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे या तिसऱ्या वनडेत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. (eng vs ind 3rd odi match team india ishan kishan may replace to rishabh pant against england)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली.  विकेटकीपर ऋषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पंत झिरोवर आऊट झाला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माचा खास विकेटकीपर खेळाडू पंतची जागा घेऊ शकतो.


पंतमुळे रोहितच्या डोकेदुखीत वाढ


पंतचा टीम इंडियासाठी कसोटीमध्ये मॅचविनर म्हणून उदय झालाय. मात्र तो सातत्याने टी 20 आणि वनडेमध्ये अपयशी ठरतोय. पंतला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. त्यामुळे कॅप्टन रोहितच्या डोकेदुखीत वाढ झालीये. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंत बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग एक विकेट गेल्या अन भारताचा पराभव झाला. त्यामुळे पंतला तिसऱ्या सामन्यातून वगळलं जाऊ शकतं.


पंतच्या जागी कोण?  


इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात युवा ओपनर विकेटकीपर इशान किशनला संधी दिली जाऊ शकते. इशान गेल्या काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय. इशामध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे इशानची पंतच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता आहे.