मुंबई: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सीरिज खेळवली जात आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिलाच कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनवेने डेब्यू करत द्विशतक ठोकलं असून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. केन विल्यमसनचा अभ्यास करून आलेल्या इंग्लंडचा संघासाठी हा धक्का पचवणं कठीण असतानाच आता त्याने अनोखा विक्रम केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेवोन कॉनवेनं आधी दादाचा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर द्वाशतक झळकवलं आणि आता 39 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. लॉर्ड्सच्या मैदानात डेब्यू करत सलामीवीर फलंदाज म्हणून डेवोनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी सौरव गांगुली यांचा सर्वाधिक धावा करण्याचा पहिला विक्रम मोडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी के एस रंजीतसिंह यांचा 125 वर्षांपूर्वीचा 154 धावांचा विक्रम देखील मोडीत काढत द्विशतक झळकवलं. 


डेवोन कॉनवेने लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी केप्लर वेसल्सचा विक्रम मोडला. डेवोन कॉनवेने आता डेब्यू कसोटी सलामीवीर फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दोन्ही डावात कॉनवेने 223 धावा केल्या. दुसर्‍या डावात 23 धावा केल्यावर तो बाद झाला तर पहिल्या डावात त्याने 23 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना केप्लर वेसल्सने 1982 साली इंग्लंडविरुद्ध 208 धावा केल्या. त्याने पहिल्या डावात 162 आणि दुसर्‍या डावात 46 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन खेळाडूचा हा विक्रम देखील डेवोनने मोडला आहे. 


डेब्यूनंतर सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीमध्ये कॉनवे पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचा फलंदाज लॉरेन्स आहे. त्याने 1972मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 314 धावा केल्या होत्या. या यादीमध्ये आता कॉनवेचं नाव पाचव्या स्थानावर आहे. तर कॉनवेच्या या तुफानी खेळीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे.