मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्यानेही कामगिरी करून दाखवली आहे. तसेच अँडरसनने भारताच्या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात अँडरसनने टॉम लॅथमला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय. अँडरसनने आपल्या १७१व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली.


सर्वाधिक कसोटी बळी
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी - 800 विकेट्स
 शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी - 708 विकेट्स
जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2022): 171 कसोटी- 650 विकेट्स
अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी - 619 विकेट


कसोटीत पदार्पण 
अँडरसनने 2 मे 2003 रोजी लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. जेम्स अँडरसनला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कमी लेखण्यात आले. पण 2007 पासून अँडरसनने आपल्या खेळात महत्त्वपूर्ण बदल करत गोलंदाजीची कमाल दाखवली.  


शेन वॉर्नच्या विक्रमावर लक्ष 
एकूण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात अँडरसन सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरन (800) विकेटसह पहिल्या स्थानी तर शेन वॉर्न (708) विकेटसह दुसऱ्या स्थानी आहे. अँडरसन तिसऱ्या स्थानी आहे.आगामी काळात अँडरसनची नजर दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला मागे टाकण्यावर असेल.