इंग्लंडचा संघ ८१ रनवर ऑलआऊट, भारताला विजयासाठी इतक्या रनची गरज
इंग्लंडचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये ही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी
अहमदाबाद : भारतीय संघाच्या स्पिनर्सपुढे इंग्लंडचा अख्खा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये ही टिकू शकला नाही. इंग्लंडचा संघ ८१ रनवर ऑलआऊट झाला आहे. भारताला जिंकण्यासाठी फक्त 49 रनची आवश्यकता आहे. टार्गेट कमी असलं तरी गुलाबी बॉलने खेळताना आव्हान अधिक असणार आहे.
दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने १५ ओव्हरमध्ये ३१ रन देत ५ विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विन याने १५ ओव्हरमध्ये ४८ रन देत ४ विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली. इंग्लंडच्या संघाकडून जो रुटने १९ रन, बेन स्टोक्सने २५ रन तर ओली पोपने १२ रन केले. इतर कोणताही खेळाडू १० रनच्या पुढे देखील येऊ शकला नाही.
पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या संघाने ११२ रन केले होते. ज्यामध्ये झॅक क्रॉले याने ५३ रन केले होते. तर रुटने १७ रन केले होते. भारतीय संघाकडून अक्षर पटेलने ६, अश्विनने ३ तर इशांत शर्माने १ विकेट घेतली होती.