भुवनेश्वर : हॉकी विश्व लीग फायनल स्पर्धेतील ब गटातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाला पराभवाचा धक्का बसला. इंग्लंडने भारताला ३-२ असे हरवले.


इंग्लंडकडून तीन तर भारताचे दोन गोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेविड गुडफील्डने इंग्लंडला २५व्या मिनिटांत पहिला गोल करताना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वॉर्डने ४३ आणि ५७व्या मिनिटाला दोन गोल केले. भारताकडून आकाशदीपने ४७व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर रुपिंदरपाल सिंगने ५०व्या मिनिटाला दुसरा गोल केला. 


पहिल्या सत्रात एकही गोल नाही


पहिला सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघाचे आक्रमण मजबूत होते मात्र एकाही संघाला गोल करण्यात यश मिळाले नाही. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जसा खेळ केला होता तशी आक्रमकता या सामन्यात भारताकडून दिसली नाही.


सोमवारी लढत जर्मनीशी


भारतीय संघाची लढत सोमवारी जर्मनीशी होणार आहे. ब गटातील अन्य लढतीत जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया संघ सोमवारी इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.