लंडन :  महिलांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून विजय मिळविला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत ५० षटकात सहा गडी गमावून २१८ धावा केल्या.  त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लडने ८ गडी गमावून २ चेंडू राखून विजय मिळविला. महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक देणारी इंग्लड हा पहिला संघ ठरला आहे. 


इंग्लंडने या वर्ल्डकपमध्ये केवळ पहिला सामना भारताविरूद्ध गमावला होता. त्यानंतर सर्व सामने जिंकले होते.  इंग्लंड पहिल्या स्थानावर होते तर दक्षिण आफ्रिका  चौथ्या स्थानावर होते. 


आता दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या २० जुलै रोजी होणार आहे. याच्यातील विजेता इंग्लंडसोबत फायनल सामना खेळणार आहे.