मुंबई : इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 'द हंड्रेड' स्पर्धेच्या एका सामन्यात अशी घटना पाहायला मिळाली, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं. या सामन्यात इंग्लिश फलंदाज अॅलेक्स हेल्सला दुखापत झाली, पण विरोधी टीममधले खेळाडू त्याला मदत करण्याऐवजी चक्क हसत राहिले.


नेमकी घटना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवल इनविंसिबल आणि ट्रेंट रॉकेट्स या दोन संघांदरम्यान सामना सुरु होता. फलंदाजी करणाऱ्या ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज अॅलेक्स हेल्स हा खेळपट्टीवर होता. फलंजदाजी करणाऱ्या अॅलेक्सचा अंदाज चुकला आणि सलग दोन चेंडूंवर अॅलेक्सला दुखापतीचा सामना करावा लागला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


सामन्यात ओवल इनव्हिजिबलचा गोलंदाज रीस टोपलेने टाकलेल्या एक वेगवान चेंडूने अॅलेक्सला दुखापत झाली आणि तो मैदानावरच कोसळला. काही वेळाने तो पुन्हा फलंदाजीसाठी उभा राहिला. पण रीस टोपलेने टाकलेला चेंडू अॅलेक्सला पुन्हा त्याच ठिकाणी लागला, आणि अॅलेक्स पुन्हा मैदानावर कोसळला.  अॅलेक्स मैदानावर वेदनेने तळमत होता, पण एकही खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आला नाही.


याही पेक्षा धक्कादायक म्हणजे दुखापतग्रस्त अॅलेक्सला मदत करायची सोडून विरोधी टीममधले खेळाडू हसताना दिसले. इतकंच नाहीत तर अंपयारही हसत राहिले. खेळाडूंच्या या वर्तणूकीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.