आयपीएलदरम्यान या टीमला मोठा झटका, कॅप्टनने तडाकाफडकी सोडली कॅप्टन्सी
मुंबईला सलग 5 पराभवांचा सामना करावा लागतोय. अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वात मोठी घडामोड घडली आहे. एकूण 5 सामन्यात पराभव झाल्याने खेळाडूने नेतृत्वाची जबाबदारी सोडली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) हंगामा सुरु आहे. अनेक संघांमध्ये पहिल्या स्थानासाठी चढाओढ पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला सलग 5 पराभवांचा सामना करावा लागतोय. अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वात मोठी घडामोड घडली आहे. एकूण 5 सामन्यात पराभव झाल्याने खेळाडूने नेतृत्वाची जबाबदारी सोडली आहे. (england cricket team joe root step down of test captaincy during to ipl 2022)
इंग्लडंचा जो रुट हा (Joe Root) कर्णधारपदावरुन पायऊतार झाला आहे. रुटने कसोटी संघाचं (England Cricket Team) कर्णधारपद सोडलं आहे. इंग्लंडला वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-1 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.
तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मानाच्या आणि प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या एशेज सीरिजमध्येही इंग्लंडला 4-0 असा पराभव झाला होता. म्हणजेच इंग्लंडला एकूण 5 सामन्यात पराभव झाला. या पराभवानंतर जो रुटचा कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय आला.
रुट काय म्हणाला?
रुटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. "कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा माझ्या कारकिर्दीताल आव्हानात्मक निर्णय आहे. पण मी माझ्या कुटुंबियांसोबत आणि जवळच्या माणसांसोबत मी याबाबत चर्चा केली. त्यानंतरच मला वाटलं की कॅप्टन्सी सोडण्याची ही योग्य वेळ आहे असं वाटलं", असं रुट म्हणाला.
सर्वाधिक विजयांचा विक्रम
जो रुट हा इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील आतापर्यंचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. जो रुटने आपल्या नेतृत्वात इंग्लंडला सर्वाधिक 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
कॅप्टन म्हणून इतक्या धावा
रुटने कॅप्टन म्हणून आतापर्यंत 46.44 च्या सरासरीने 5 हजार 295 धावा केल्या आहेत. यामध्ये रुटने 14 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.