इंग्लंडमध्ये चाललंय काय? तिसरा मोठा धक्का! वर्ल्ड कप तोंडावर असताना `या` स्टार खेळाडूची निवृत्ती
Alex Hales announces retirement: इंग्लंडचा स्टार सलामीवीर आणि मागील वर्षी इंग्लंडला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका गाजवणाऱ्या ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची (Annouced Retirement From International Cricket ) घोषणा केली.
Alex Hales' retirement from England cricket: अॅशेस मालिकेचा शेवटचा सामना इंग्लंडसाठी खास ठरला. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने दणक्यात विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडच्या दोन चॅम्पियन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. अॅशेस मालिकेनंतर दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) या दोघांनी निवृत्ती जाहीर केले होती. त्यानंतर आता शुक्रवारी इंग्लंडचा स्टार सलामीवीर आणि मागील वर्षी इंग्लंडला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका गाजवणाऱ्या ऍलेक्स हेल्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची (Alex Hales announces retirement) घोषणा केली.
निवृत्ती घेताना काय म्हणाला Alex Hales?
मी आयुष्यभर टिकण्यासाठी काही आठवणी आणि काही मैत्री केली आहे आणि मला वाटतं की आता पुढं जाण्याची योग्य वेळ आहे, असं म्हणत एलेक्स हेल्सने निवृत्ती जाहीर केली आहे. माझ्या संपूर्ण काळात इंग्लंडच्या शर्टमध्ये मी काही सर्वोच्च उच्च तसेच काही सर्वात खालच्या पातळीचा अनुभव घेतला आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास होता आणि मला खूप समाधान वाटतं की इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना विश्वचषक फायनल जिंकला होता. सर्व चढ-उतारांदरम्यान मला माझे मित्र, कुटुंब आणि निःसंशयपणे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट चाहत्यांकडून खूप मोठा पाठिंबा मिळाला. नॉट्सकडून खेळत राहण्यासाठी आणि जगभरातील अधिक फ्रँचायझी क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे, असं एलेक्स हेल्स म्हणाला आहे.
दरम्यान, 34 वर्षीय टॉप ऑर्डर फलंदाजाने ऑगस्ट 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तीनही फॉरमॅटमध्ये 156 सामने खेळले. त्याने सात शतकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा केल्या. T20I फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू होता, हा पराक्रम त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केला होता. गेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये हेल्सने इंग्लंडच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध 47 बॉलमध्ये 86 धावांची नाबाद खेळी केली आणि जोश बटलरनंतर तो स्पर्धेत इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकता आला.