Danielle Wyatt Engagement: इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू डॅनिएल वायटने (Danielle Wyatt) नुकतीच एक मोठी घोषणा केली. डॅनिएलने आपली प्रेयसी जॉर्जी हॉजबरोबर (Georgie Hodge) एग्नेजमेंट केली आहे. डॅनिएलने सोशल मीडियावरुन जॉर्जीला किस (Danielle Wyatt Georgie Hodge Kiss) करतानाचा फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. डॅनिएल आणि जॉर्जी मागील बऱ्याच काळापासून एकमेकांनी डेट करत होत्या. विशेष म्हणजे डॅनिएलने एकेकाळी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर डॅनिएलचं नाव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरशीही जोडण्यात आलं होतं. 


विराटला घातली होती लग्नाची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॅनिएलने पोस्ट केलेला फोटो पाहून तिच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. भारतीय चाहत्यांचंही लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. यामागील मुख्य कारण ठरत आहे डॅनिएलने एकदा विराट कोहलीला घातलेली लग्नाची मागणी. डॅनिएलने एकदा सोशल मीडियावरुनच विराटला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आपल्याला विराटबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे असं डॅनिएल सोशल मीडियावरील पोस्टवर म्हणाली होती. 2014 साली डॅनिएलने विराटला प्रपोज केलं होतं. यामध्ये तिने, "विराट मॅरी मी" म्हणजेच विराट माझ्याशी लग्न कर असं म्हटलं होतं. तसेच डॅनिएल ही सचिनचा मुलगा अर्जुनचीही चांगली मैत्रीण आहे. त्यामध्ये मध्यंतरी या दोघांच्या कथित नात्याबद्दलही अनेक प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्या होत्या. 


किस करतानाचा फोटो केला शेअर


महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर डॅनिएलने आपल्या गर्लफ्रेण्डला रिंग घालून एग्नेजमेंट केल्याची घोषणा केली. 2 मार्च रोजी डॅनिएलने सोशल मीडियावर गर्लफ्रेण्डला किस करत बोटामध्ये घातलेली एक्नगेजमेंट रिंग दाखवताना फोटो पोस्ट केला. डॅनिएलची जोडीदार असलेली जॉर्जी ही सीएएमधील फुटबॉल महिला संघाची प्रमुख आहे. दोघींचेही सोशल मीडियावर अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात. एन्गेजमेंटचा फोटो शेअर करताना डॅनिएलने, "माइन फऑरएव्हर" अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच ती कायमची माझीच झाली आहे, अशा अर्थाची कॅप्शन या फोटोला डॅनिएलने दिली आहे. 



क्रिकेटमधील कामगिरी कशी?


डॅनिएल वायटच्या क्रिकेट करियरबद्दल बोलायचं झालं तर तिने इंग्लंडच्या महिला संघाकडून 102 एकदिवसीय सामने आणि 143 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1776 धावा केल्या असून टी-20 मध्ये 2369 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास डॅनिएलच्या नावावर वनडेमध्ये 27 तर टी-20 मध्ये 46 विकेट्सची नोंद आहे.