यजमानांचा पत्ता कट, श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक!
`क्या से क्या हो गया`, श्रीलंकेचा पराभव अन् दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेबाहेर!
SL vs Eng : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (t-20 World Cup 2022) ग्रुप 1 मधील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. इंग्लंड संघाने श्रीलंकेचा पराभव करत सेमी फायनलचं तिकीट पक्क केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 141 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये इग्लंडने हे आव्हान पूर्ण करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. (England defeated SriLanka to secure a place in the semi-finals of the T20 World Cup Latest Sport marathi News)
श्रीलंकेकडून सलामीवीर पाथूम निसांकाने 67 धावांवची दमदार अर्धशतकी खेळी केली. राजपक्षे 22 धावा आणि कुसल मेंडिस 18 धावा हे तीन फलंदाज वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेने 141 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, सॅम करन आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंड संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर मजबूत सुरूवात केली. 75 धावांची सलामी दिली होती बटरलला 28 धावांवर वानिंदू हसरंगाने बाद करत ही जोडा फोडली. अॅलेक्स हेल्सने आक्रमक सुरूवात केली होती त्यालाही 47 धावांवर हसरंगाने माघारी पाठवलं.
एकतर्फी सामना होईल असं वाटत होतं मात्र हार मानेल ती श्रीलंका कसली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. मात्र बेन स्टोक्सने एक बाजू लावून धरली होती. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता मात्र ख्रिस वोक्सने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.