नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटर जुन्या आठवणी सांगून होणाऱ्या गौप्यस्फोटामुळे चर्चेत येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्यावर टीममधील काहीजण जळायचे असे वक्तव्य माजी ऑल राऊंडर इरफान पठाणने  काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर क्रिकेट वर्तुळात खूप चर्चा झाली. आता माजी क्रिकेटर महम्मद कैफनेही गौप्यस्फोट केलाय.


ही गोष्ट २००२ साली झालेल्या नेटवेस्ट सिरीजमधील आहे. यावेळी इंग्लडला भारतीय संघाने जबरदस्त मात दिली होती.


सौरभ गांगुलीने टी शर्ट काढून गरगरा फिरवून आनंद साजरा केलेली हीच ती मॅच. ३२६ रन्सच अशक्यप्राय आव्हान भारताने पार केलं होत. त्यामुळे या मॅचला वेगळंच महत्व होतं


'बस ड्रायव्हर म्हणून हिणवलं'


 या मॅचवेळी इंग्लडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने मला बस ड्रायव्हर म्हणून हिणवल्याचे महम्मद कैफ याने सांगितले. 


आपल्या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना त्याने हा किस्सा सांगितला. 


तुम्हाला उद्देशून इंग्लडच्या खेळाडूंनी काही म्हटले का ? असा प्रश्न कैफला त्याच्या चाहत्याने विचारला.  'हो. नासीर हुसेनने आपल्याला बस ड्रायव्हर म्हटले.' असे कैफने सांगितले.