INDIA vs ENGLAND 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडला मोठा धक्का, स्टार गोलंदाज संघाबाहेर
टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
मुंबई : टीम इंडिया लवकरच इंग्लंड विरुद्ध (India vs England Test Series 2021 ) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लिश टीमचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे संघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा झटका समजला जात आहे. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (england faster bowler Jofra Archer out of test series against team india due to right hand surgery)
उजव्या कोपरावर शस्त्रक्रिया
जोफ्राच्या उजव्या कोपराला दुखापत झाली होती. या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या संदर्भात एक ट्विट केलंय. "वैदयकीय पथकाने जोफ्राच्या उजव्या कोपराची पाहणी केली. त्यानुसार जोफ्रावर शस्त्रक्रिया होणार आहे", अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत दिली.
आर्चरच्या उजव्या कोपरावर 21 मे ला शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर जोफ्राला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जोफ्रा ठराविक कालावधी उपलब्ध नसणार आहे. जोफ्रा इंग्लंडच्या महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. जोफ्रा टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे.
जोफ्राने या दुखापतीमुळे नुकतीच न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही माघार घेतली आहे. तसेच त्याने आयपीएलच्या 14 व्या मोसमातूनही आपले नाव मागे घेतले होते. आर्चरला गेल्या काही महिन्यांपासून कोपऱ्याच्या दुखापतीने ग्रासले आहे.
टेस्ट सीरिजचे वेळापत्रक
1. पहिली टेस्ट, 4 ते 8 ऑगस्ट
2. दुसरी टेस्ट, 12 ते 16 ऑगस्ट
3. तिसरी टेस्ट, 25 ते 29 ऑगस्ट
4. चौथी टेस्ट, 2 ते 6 सप्टेंबर
5. पाचवी टेस्ट, 10 ते 14 सप्टेंबर
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.