Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा `या` टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात
Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025 ) फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळण्या करता पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी ही हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल. हायब्रीड मॉडेलमुळे भारत - पाकिस्तानातील वाद संपला असताना आता अजून एक नवा वाद समोर आला आहे. इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे.
ब्रिटनच्या संसदेत गाजला चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुद्दा :
ब्रिटनच्या संसदेत ब्रिटनच्या 160 सदस्यांनी इंग्लडच्या एंड वेल्स क्रिकेट बोर्डकडे मागणी केली की त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामना खेळू नये. याच कारण म्हणजे अफगानिस्तानमध्ये तालिबानींद्वारे महिलांच्या अधिकारांवर आणलेली गदा. ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहात याबाबत आवाज उठवण्यात आला आहे. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या संसदीय सभागृहांनी ECB ला महिला आणि मुलींच्या हक्कांचे उल्लंघन आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारकडून त्यांना दिल्या जात असलेल्या घृणास्पद वागणुकीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. तसेच महिलांना खेळापासून देखील दूर ठेवण्यात आले आहे.
ECB च्या सीईओने काय भूमिका घेतली :
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचार्ज गोल्ड यांनी म्हटले की, "या प्रकरणात सर्व आयसीसी सदस्य एकत्र आले तर त्याचा अधिक परिणाम होईल". ते पुढे म्हणाले की, "ईसीबीने अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीकडून महिला आणि मुलींशी केलेल्या गैरवर्तनावर टीका केली आहे. आयसीसीच्या घटनेत असे म्हटले आहे की सर्व सदस्यांनी महिला क्रिकेटसाठी वचनबद्ध असले पाहिजे. हे ओळखून ईसीबीने अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले". इंग्लंड अफगाणिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळली नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तान समोरच टेंशन वाढणार आहे. आधीच टीम इंडिया पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी येणार नाही, अशात इंग्लंडने देखील अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला तर त्याचा फटका यजमान पाकिस्तानला सुद्धा बसेल.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार फलंदाज शर्यतीत
चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड संघ :
जोश बटलर (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस एट्किंसन, जॅकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्राइडन कार्स, बेन डकेट, जेमि ओवर्टन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वुड.