इंग्लंड आणि क्रोएशियामध्ये रंगणार आज दुसरी सेमीफायनल
फायनलपासून फक्त एक पाऊल मागे
मुंबई : फुटबॉल विश्वचषकात दुसरी सेमीफायनल इंग्लंड आणि क्रोएशियामध्ये रंगणार आहे. हे दोन्हीही संघ 2014 विश्वचषकातील आपल्या कटू आठवणी मागे टाकून आता नवा इतिहास रचण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. या लढतीत इंग्लंडच्या संघाचं पारड जड मानलं जात आहे.
इंग्लंडने एकदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. क्रोएशियाने दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. हे दोन संघ या फुटबॉल विश्वचषकात उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध आमने-सामने उभे ठाकणार आहेत. इंग्लंडनं उपांत्य फेरीत जरी धडक मारली असली तरी ते साखळी फेरीत अखेरच्या लढतीत बेल्जियमकडून पराभवाला सामोर गेले आहेत. या लढतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. हॅरी केन हा या विश्वचषकातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. हॅरी केनच्या नावे आतापर्यंत सहा गोल्स आहेत. इंग्लंडकडून आतापर्यंतच्या चार लढतींमध्ये अकरा गोल्स केले गेले आहेत.
इंग्लंडच्या तंबूत दुखापतींमुळे थोडं चिंतेचं वातावरण आहे. कायले वॉल्कर, डेले अली आणि एश्ले याँग हे दुखापतीतून नुकतेच सावरलेले आहेत. तर जॉर्डन हेंडरसन हा थोडासा दुखापतग्रस्त आहे. मात्र तो क्रोएशियविरुद्ध खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर क्रोएशिया संघासमोरही दुखीपतींची चिंता आहे. सिम वर्स्लिको हा दुखापतीमुळे उपांत्य फेरीला मुकणार आहे. तर रशियाविरुद्ध ज्याला आश्चर्यकारकरित्या खेळायला पाठवलं त्या आँद्रेज क्रामारिक ला उपांत्य फेरीत पुन्हा खेळवण्याची शक्यता आहे. १९९८नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठ ली आहे. विश्वचषकात हे दोन संघ प्रथमच आमने-सामने येत आहेत. या विश्वचषकात क्रोएशिया आतापर्यंत अपराजित असून गेल्या चार लढतींमध्ये क्रोएशियानं दहा गोल्स केले आहेत.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सात लढती झाल्या आहेत. यातील चार लढती इंग्लंडनं जिंकल्या असून दोन मुकाबले हे क्रोएशियानं जिंकले आहेत. तर एक सामना हा ड्रॉ झाला आहे. गेल्या विश्वचषकात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या हे दोन्ही संघ अंतिम फेरी गाठायचीच याच इराद्यानं मैदानात उतरतील.
Fifa World cup 2018 | Football World Cup 2018 | Football Semifinal | England Vs Croatia