लॉर्ड्स : वर्ल्डकपमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमसाठी आजची मॅच ही प्रतिष्ठेची असणार आहे. ही मॅच लॉर्ड्सवर खेळण्यात येणार आहे. टीम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पॉइंट्सटेबलमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.


ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकममध्ये 6 मॅचपैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. तर यजमान इंग्लंडने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. दोन्ही टीमसमोर आजची मॅच जिंकून आपले स्थान अजून तगडे करण्याचे आव्हान दोन्ही टीमसमोर असणार आहे.
 
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 81 तर इंग्लंडने 61 सामने जिंकले आहेत. तर 2 मॅच या अनिर्णित राहिल्या, तर 3 मॅच रद्द कराव्या लागल्या. 


वर्ल्डकपमध्ये या दोन्ही टीममध्ये एकूण 7 मॅच खेळण्यात आल्या आहेत. यापैकी 5 मॅच ऑस्ट्रेलियाने तर 2 इंग्लंडने जिंकल्या आहेत. 


टीम इंग्लंड : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जॉस बटलर, टॉम कुरेन, लियाम डॉसन, लियाम प्लंकट, आदील राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स विंसे, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.


टीम आस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, नॅथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क्स स्टोइनिस आणि एडम झॅंम्पा.