मुंबई : जो रूट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर इंग्लंडचा नवा कर्णधार कोण अशी चर्चा रंगली होती. अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. इंग्लंडच्या कसोटी फॉरमॅटचा नवा कर्णधार अखेर ठरला. जो रूटनंतर स्टार खेळाडू ही कमान सांभाळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा दुश्मन आणि काही बॉलमध्ये मॅच पलटवण्याचं कौशल्य असलेला बेन स्टोक्स कर्णधार झाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डनं याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 


स्टोक्सने अवघ्या काही बॉलमध्ये सामना पलटवण्यात माहीर आहे. त्यामुळे स्टोक्सही इंग्लंड क्रिकेट बोर्डची पहिली पसंती ठरली. जो रूटनंतर तोच इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.