नवी दिल्ली : टी-१० क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनने खेळलेल्या तुफानी इनिंगमुळे केरळ किंग्सने पंजाबी लेजेड्सवर आठ विकेट्सने विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयासोबतच केरळ किंग्सने टी-१० क्रिकेट टूर्नामेंटचा खिताब आपल्या नावावर केला आहे. 


ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या मॉर्गनने धडाकेबाज बॅटिंग करत अवघ्या १४ बॉल्समध्येच आपली हाफ सेंच्युरी लगावली आहे.


मॉर्गनने या मॅचमध्ये एकणू २१ बॉल्समध्ये पाच फोर आणि सहा सिक्सर लगावत ६३ रन्सची इनिंग खेळली. मात्र, मॅचच्या शेवटी हसन अलीने त्याला आऊट केलं.


मॉर्गनने केलेल्या या धडाकेबाज बॅटिंगमुळे केरळच्या टीमने जिंकण्यासाठी आवश्यक असलेले १२१ रन्स अवघ्या आठ ओव्हर्समध्येच केले. 


रविवारी रात्री झालेल्या या मॅचमध्ये केरळ किंग्सच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबी लेजेंड्सच्या टीमने १० ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावत १२० रन्स केले.


पंजाबी लेजेंड्सच्या टीमकडून ल्यूक रोंकी याने ३४ बॉल्समध्ये ७० रन्सची इनिंग खेळली. त्याने ५ सिक्सर लगावले. रोंकीसोबतच शोएब मलिक याने १४ बॉल्समध्ये २६ रन्स केले. दोघांनी खेळलेल्या या इनिंगमुळे पंजाबी लेजेंड्सच्या टीमला १२० रन्स करता आले.


मात्र, पंजाबी लेजेंड्सच्या टीमने दिलेलं हे आव्हान केरळ किंग्सच्या टीमने अवघ्या ८ ओव्हर्समध्येच गाठत विजय मिळवला.