ऑलराऊंडर खेळाडू करणार इंग्लंड टीमचं नेतृत्व? दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
जो रूटनं कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कॅप्टनच्या शोधात आहे. त्यासाठी काही नावांची चर्चा होतीच पण आता एक मोठी बातमी येत आहे. दिग्गज क्रिकेटरनं एक नाव समोर आणलं आहे.
मुंबई : जो रूटनं कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कॅप्टनच्या शोधात आहे. त्यासाठी काही नावांची चर्चा होतीच पण आता एक मोठी बातमी येत आहे. दिग्गज क्रिकेटरनं एक नाव समोर आणलं आहे. इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्या खांद्यावर जाईल अशी भविष्यवाणी केली आहे. लवकरच यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा याकडे आहेत.
जगातील सर्वोत्तम इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचं नाव आहे. पण इंग्लंडच्या कर्णधारपदासाठी जो रूटएवढ्याच उत्तम कौशल्याचा खेळाडू निवडण्याचं मोठं आव्हानही आहे. हे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. कारण लवकरच कर्णधारपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते.
इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने ऑलराऊंडर बेन स्टोक्सकडे कर्णधारपद येऊ शकतं असं भाकीत केलं. इयोनच्या मते स्टोक्स एक महान कॅप्टन बनू शकतो त्याच्याकडे उत्तम कौशल्य असल्याचं तो सांगतो. रूट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर स्टोक्सच कसोटी कर्णधारपदासाठी योग्य असेल असा दावा इयोननं केला.
स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी टीमचा उपकर्णधार आहे. अशा स्थितीत हे पद सांभाळण्यासाठी ते सर्वाधिक दावेदार मानले जात आहेत. रूटच्या अनुपस्थितीत स्टोक्स टीमचे नेतृत्व करत असे. त्यामुळे तो दावेदार असून लवकरच त्याच्या नावाची घोषणा होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
'माझ्या कारकिर्दीताल आव्हानात्मक निर्णय आहे. पण मी माझ्या कुटुंबियांसोबत आणि जवळच्या माणसांसोबत मी याबाबत चर्चा केली. त्यानंतरच मला वाटलं की कॅप्टन्सी सोडण्याची ही योग्य वेळ आहे असं वाटलं', असं जो रुट कर्णधारपद सोडताना म्हणाला होता.