मुंबई: क्रिकेटच्या सामन्यादरम्यान अनेक मजेशीर प्रकार घडत असतात. पण एका सामन्यात हिरोगिरी करणं फील्डरला चांगलंच महागात पडलं आहे. उत्साहाच्या भरात या फील्डरने जे केलं ते पाहून दोन मिनिटं तुम्हालाही हसू आवरणार नाही. हिरोगिरी करण्याच्या नादात झिरो बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपियन क्रिकेट लीग दरम्यान, एका फील्डरने उत्तम फील्डिंग करत चौकार जाणारा बॉल अडवला. मात्र उत्साहाच्या भरात त्याने असं काही केलं की तो सर्वांच्याच थट्टेचा विषय बनला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की फील्डिंग करणारा तरुणा बाउंड्रीआधी बॉलला अडवतो. तो बॉल गोलंदाजाकडे फेकण्याऐवजी उत्साहाच्या भरात बाउंड्रीबाहेर फेकतो. सर्वजण हे पाहून हैराण होतात.


16 व्या वर्षात डेब्यू 24व्या वर्षी जिंकले 2 वर्ल्डकप...2 वर्षांनी क्रिकेटला म्हणाली गुडबाय!


फील्डलकडून झालेल्या या चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्याच्या या कृतीनंतर राग व्यक्त करावा की हसावं हे दोन मिनिटं कोणालाच समजेना. बॉल गोलंदाजाकडे फेकण्याऐवजी थेट बाउंड्री बाहेर या फील्डरने फेकला आणि त्याची चर्चा जगभरात झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.