मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दोन बड्या खेळाडूंमधील वादाच्या चर्चा नेहमीच चर्चेत येतात. मग ते कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्यात असो, अझहर-सिद्धू यांच्यात असो किंवा धोनी आणि सेहवाग यांच्यात असो. अलीकडच्या काळात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात अशा बातम्या समोर आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद परत घेतल्यानंतर या दोन खेळाडूंच्या चर्चेला उधाण आलंय. यासोबतच बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने नवा वाद निर्माण केला आहे. विराट कोहलीने बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुलीच्या विधानाच्या विरोधात जाऊन टी-20 चं कर्णधारपद सोडण्यास कोणीही मनाई केली नसल्याचं विधान केलं. विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे बोर्ड आणि कर्णधार यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. मीडियाशिवाय अनेक माजी खेळाडूंनीही कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या आयसीसी टूर्नामेंटमधील कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्यात भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीवर कोणताही मोठा विजय न मिळवता या पदावर कायम राहण्याचा दबाव वाढत होता.



दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी निवड समितीने मोठा निर्णय घेत विराट कोहलीकडून कर्णधारपद हिसकावून रोहित शर्माकडे सोपवलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या निर्णयाबाबत वक्तव्य केलं. या निवेदनात सौरव गांगुली म्हणाले, 'बोर्ड आणि सिलेक्टर्सने विराट कोहलीला टी-20 कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती, जी विराटने मान्य केली नाही आणि सिलेक्टर्सना असं वाटलं की व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगळे कर्णधार असणं योग्य होणार नाही. त्यामुळे विराटच्या जागी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात येतंय.


नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने बोर्डाच्या निर्णयाचं स्वागत केलं. या निर्णयानंतर विराट बुधवारी पत्रकार परिषदेत आला आणि म्हणाला की, बोर्डाने त्याला दीड तास आधीच या निर्णयाची माहिती दिली होती. सौरव गांगुलीच्या मुद्द्याला विरोध करताना विराट कोहली म्हणाला, 'मला टी-20 कर्णधारपद न सोडण्यास कोणीही मनाई केली नाही. सर्वांनी हा निर्णय स्वीकारला'.  


विराटने वनडे संघाच्या कर्णधारपदावर जाण्याबाबत मौनंही सोडलं. विराट म्हणाला, 8 डिसेंबरला मला निवड बैठकीच्या दीड तास आधी बोलावण्यात आलं होतं. टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर माझ्याशी कर्णधारपदाच्या विषयावर बोलणं झालं नाही. बैठकीत कसोटी संघाबाबत चर्चा झाली, ज्याबद्दल सर्वांनी एकमताने संघातून संघाची निवड केली आणि नंतर मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल सांगण्यात आलं, त्यानंतर मी हा निर्णय मान्य केला.



यापूर्वी 48 तासांपूर्वी विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आल्याचं वृत्त होतं. त्यानंतर बोर्ड आणि निवड समितीने एकत्रितपणे हा निर्णय घेतला. विराटच्या या पत्रकार परिषदेनंतर आता प्रतीक्षा आहे ती बोर्डाच्या विधानाची, ज्यात विराट कोहलीच्या विधानात सत्यता दिसून येते की बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या. दोघांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टीममध्येही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.