Dhanashree Verma : टीम इंडियाचा ( Team India ) स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतो. चहलसोबत त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) हिची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. सध्या सोशल मीडियावर धनश्री वर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा आहेत. या दोघांचंही नाव एकमेकांशी जोडलं जातं. अशातच आता धनश्रीने ( Dhanashree Verma ) तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये ती लवकरच सगळं ठीक होईल असं म्हणतेय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 


धनश्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री वर्माने नुकतंच तिचा एक 26 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये धनश्रीने ( Dhanashree Verma ) इंग्रजी मधून एक गाणं म्हटलं असून चाहते मात्र यावेळी भावूक झाले आहे. तर सोशल मीडियावर चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, हे गाणं युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्यासाठी आहे. 


सगळं काही ठीक होईल...


फेमस इंग्रजी सिंगर हेनरी मूडी यांचं 'पिक अप द फोन' हे गाणं धनश्रीने ( Dhanashree Verma ) म्हटलंय. या गाण्याचे बोल असे आहे की, "सगळं काही ठीक होईल, प्रत्येकाचा वाईट दिवस येतो. मात्र लक्षात ठेवा तुम्ही सांगितलेलं, की तू एकटा नाहीयेस. फक्त फोन उचल आणि जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा मला फोन कर. आठव तू मला सांगितलेलंस की, तू एकटा नाहीयेस, फक्त फोन कर...."


सोशल मीडियावर रंगली चर्चा!


दरम्यान धनश्रीने ( Dhanashree Verma ) म्हटलेल्या गाण्याचे बोल हे 'सगळं काही ठीक होईल, तू एकटा नाहीयेस' असे आहेत. युझर्सने याचा थेट संबंध युझवेंद्र चहलशी लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून धनश्री आणि युझवेंद्र ( Yuzvendra Chahal ) यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातंय.  



श्रेयस अय्यरसोबत अफेअर असल्याची चर्चा


टीम इंडियाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचं ( Dhanashree Verma ) नाव फलंदाजी श्रेयस अय्यरशी जोडण्यात येतं. या दोघांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलंय. याशिवाय काही दिवसांपूर्वी दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीतील जागा एकच असल्याचं म्हटलं गेलंय. दरम्यान युझवेंद्र चहल आणि धनश्रीने ( Dhanashree Verma ) या अफवांचं खंडन केलं होतं.