EXCLUSIVE: पप्पा म्हणाले क्रिकेट पॅशन आहे तर खेळ, अभ्यासाची चिंता नको - मयांक अग्रवाल
स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारा कर्नाटकचा युवा क्रिकेटर मयंक अग्रवालने टीम इंडियामध्ये एंट्रीसाठी सज्ज झालाय. मात्र यासाठी त्याला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. दरम्यान, मयांकला याबाबतीत सध्या टेन्शन नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच संधी मिळेल असे त्याला वाटते.
मुंबई : स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारा कर्नाटकचा युवा क्रिकेटर मयंक अग्रवालने टीम इंडियामध्ये एंट्रीसाठी सज्ज झालाय. मात्र यासाठी त्याला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. दरम्यान, मयांकला याबाबतीत सध्या टेन्शन नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच संधी मिळेल असे त्याला वाटते.
सचिन तेंडुलकरला पाहून क्रिकेट खेळणारा मयांक सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचा डंका वाजवतोय. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना त्याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटर्सचेही अनेक रेकॉर्ड मोडलेत.
मयांक अग्रवालने रणजी ट्रॉफी २०१७-१८मध्ये १०५.४५च्या सरासरीने ११६० धावा ठोकल्या. यात ५ शतकांचा समावेश आहे. मुश्ताक अली टी-२० टूर्नामेंटमध्ये ९ सामन्यात १२८च्या स्ट्राईक रेटने २५८ धावा केल्या. तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १००च्या सरासरीने ७२३ धावा केल्या
मयांक अग्रवाल भारतीय क्रिकेटच्या कोणत्याही ए लिस्ट टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा इतिहासातील पहिला खेळाडू बनलाय. स्थानिक क्रिकेटमधील एका सीझनमध्ये दोन हजाराहून अधिक धावा कऱणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. यात ८ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूचे हे यश पाहता ZEE News हिंदी ऑनलाइनने त्याच्याशी खास बातचीत केली. या मुलाखतीती महत्त्वाचे मुद्दे
सचिनला पाहिले आणि क्रिकेटच खेळायचे ठरवले
मयांक अग्रवालने क्रिकेटची कशी सुरुवात झाली याबाबत बोलताना म्हटले, सचिन तेंडुलकरला खेळताना पाहिले आणि मी विचार केला मीही खेळलो पाहिजे. मी जेव्हा १० वर्षांचा होतो तेव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की समर कॅम्पना सुरुवात होत असे तेथे मी क्रिकेट खेळत असे.
तो पुढे म्हणाला, सचिन तेंडुलकरमुळे माझे क्रिकेटवरील प्रेम वाढले. सचिनला खेळताना पाहून छान वाटायचे. त्याला पाहून मलाही खेळायचे असे वाटायचे. तेव्हा विचार केला नव्हता की कितपत खेळू शकेन. मात्र प्रयत्न जरुर करेन. तेव्हापासून क्रिकेट खेळण्यास सुरवात केली.
१०वीनंतर घेतला निर्णय
क्रिकेटचा करियर म्हणून विचार १०वीनंतर केला. मी १०वी पास केली होती. त्यावेळी माझे वय १५-१६ होते. पुढे अभ्यास करायचा वा क्रिकेट खेळायचे याबाबत निर्णय घ्यायचा होतो तेव्हा मी क्रिकेटला निवडले.
अभ्यासाचीही चिंता होती
कुटुंबाने दिलेल्या सपोर्टबाबत बोलताना मयांक म्हणाला, क्रिकेटमध्ये करियर कऱण्यासाठी मला घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला. माझ्या वडिलांनी क्रिकेट खेळण्यापासून मला कधीच रोखले नाही. दरम्यान, क्रिकेट खेळताना अभ्यास मागे पडेल की काय याची चिंता मला सतावत होती. मात्र त्यावेळी पप्पा म्हणाले, अभ्यास महत्त्वाचा आहेत. मात्र २-३ वर्षे पुढे मागे झाली हरकत नाही. क्रिकेट तुझे पॅशन आहे आणि तुला जर पुढे खेळत राहायचे असेल तर पूर्ण मेहनत घेऊन झोकून दे.
वीरेंद्र सेहवाग आहे रोलमॉड़ेल
मयांक अग्रवालचा क्रिकेटमधील रोलमॉड़ेल आहे वीरेंद्र सेहवाग. वीरेंद्रचा क्रिकेटमधील आक्रमक अंदाज मयांकला भावला.
स्थानिक क्रिकेट हाच पाया
स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत मयांकला विचारले असता तो म्हणाला, स्थानिक क्रिकेट हा प्रत्येक क्रिकेटरसाठी पाया असतो. त्याच्यासाठी हा करिअरमधील ब्रेक असतो. भारतात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जाते. जर एखादा क्रिकेटर स्थानिक स्तरावर चांगली कामगिरी करत असेल तर त्याचे परिणाम नक्कीच चांगले दिसतात.
फक्त टॅलेंट पाहिले जाते, फॉरमॅट नाही
रणजी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या तीनही स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करणारा मयांक अग्रवालच्या मते त्याच्यासाठी हे तीनही फॉरमॅट महत्त्वाचे आहेत. मी तीनही फॉरमॅट एन्जॉय करतोय. माझ्या मते एक खेळाडू म्हणून तुम्ही सगळी चॅलेंजेस स्वीकारली पाहिजेत. तसेच त्याला सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे. कार येथे फक्त टॅलेंट पाहिले जाते क्रिकेटचा फॉरमॅट नाही. तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये जर बेस्ट कामगिरी करत असाल तर तुम्ही बेस्ट क्रिकेट खेळताय.
टीम इंडियामधील एंट्रीवर नो कमेंट
टीम इंडियामधील एंट्रीबाबत मयांकला विचारले असता त्याने याबाबत कोणतेही विधान करणे टाळले. मी फक्त इतकंच म्हणेन की जी गोष्ट तुम्हाला मिळणार असेल तर ती तुम्हाला मिळेलच. जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्याबाबतीत विचार करुन काय फायदा. तुम्ही जे करताय ते सतत चांगले करत राहिले पाहिजे. देवाने तुमच्यासाठी जे काही ठेवलेय ते तुम्हाला मिळणारचं.
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामधील मयांकच्या एंट्रीबाबत सवाल उपस्थित केले जातायत. यातच टीम इंडियाचे निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांनी म्हटले होते, मी मयांकशी बोललोय. आम्ही प्रत्येक खेळाडूला संधी देणार आहोत. मयांकशी बोललो असून त्याची स्थानिक पातळीवर चांगली कामगिरी होतेय. यासाठी त्याला लवकरच राष्ट्रीय पातळीवर निवडले जाणार आहे.
आयपीएलमध्ये खेळणे हे माझे मोठे यश
आयपीएल हा खेळाडूंसाठी चांगला आणि महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. विशेष करुन स्थानिक खेळाडूंसाठी आयपीएलचा फायदा होतो. आयपीएलमध्ये अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये हजारो प्रेक्षक सामना बघण्यासाठी येतात. इतक्या लोकांसमोर परफॉर्म करणे हेच मोठे यश असते.
शेन वॉर्नसोबत खेळण्याची इच्छा
मला माझ्या कारकिर्दीत एकदा शेन वॉर्नसोबत खेळण्याची इच्छा आहे.
गर्लफ्रेंडला दिले होते सरप्राईज
आपल्या लव्हस्टोरीबाबत बोलताना मयांक म्हणाला, मी खूप लाजाळू आहे आणि पर्सनल लाईफबाबत बोलत नाही. मात्र हा मी माझ्या गर्लफ्रेंडला लंडनमध्ये प्रपोज केले होते. माझी गर्लफ्रेंड लंडनमध्ये शिकण्यासाठी गेली होती. माझ्याकडे संधी होती काहीतरी स्पेशल करण्याची. त्यामुळे मी तिला सरप्राईज देत प्रपोज केले होते.
प्रत्येक क्रिकेटर असतो खास
टीम इंडियाच्या बेस्ट बॅट्समनबद्दल मयांकला विचारले असता संघात प्रत्येक खेळाडूचा रोल हा वेगवेगळा असतो आणि तितकाच महत्त्वपूर्ण असतो. मी कोणाचीही कोणाशीही तुलना करत नाही. प्रत्येक क्रिकेटर खास असतो.