न्यूझीलंड : टी-20 वर्ल्डकप सुरु झाला असून प्रत्येक टीम तयारी करतेय. मात्र न्यूझीलंडसाठी आणि न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीये. ही बातमी म्हणजे न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विलियम्सन वर्ल्डकपचे काही सामने खेळणार नसल्याची शक्यता आहे. केनच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून तो काही सामने मुकण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी झालेल्या सराव सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात केनचा समावेश करण्यात आलेला. मात्र विल्यमसन सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिसला, पण खबरदारी म्हणून त्याने फलंदाजी केली नाही.


न्यूझीलंड टीमचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितलं की, पहिल्या सराव सामन्यानंतर विलियम्सनची कोपराची दुखापत अधिकच बिकट झाली आहे. विलियम्सनने त्या सामन्यात 30 चेंडूत 37 धावा केल्या होत्या, पण न्यूझीलंडला तीन विकेटने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.


विलियम्सन काही सामन्यांमध्ये बाहेर राहण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टीडने एका वेबसाईटला सांगितलं की, “ही शक्यता आहे. आम्हाला आशा आहे की तो योग्य विश्रांती आणि संतुलन राखून खेळू शकेल."


न्यूझीलंडला मंगळवारी पाकिस्तानशी सामना करायचा आहे. परंतु उर्वरित चार सुपर -12 सामने सात दिवसांच्या आत खेळावे लागणार आहेत. ज्यात केनला  विश्रांतीची शक्यता कमी आहे.


स्टीड पुढे म्हणाले, 'गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या फलंदाजांपैकी एक केन आहे. तो त्याच प्रकारे तयारी करतोय. पण कधीकधी यामुळे नुकसान होतं. आम्ही योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहोत."