Kane Williamson Injury : न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात किवींनी पाकिस्तानचा 21 धावांनी धुव्वा उडवला. बाबर आझम (Babar Azam) याने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. मात्र, न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा विजय पळवला अन् मालिका 2-0 ने आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 19.3 ओव्हरमध्ये 173 धावाच करता आल्या. सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाली. हॅमस्ट्रिंग निगलमुळे विल्यमसन मैदानाबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीत टीम साऊथीला उर्वरित सामन्यासाठी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. 15 बॉलमध्ये 26 धावांची आक्रमक खेळी केनने केली होती. त्यानंतर त्याला वेदना होत असल्याने त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.



न्यूझीलंडकडून फिन ऍलन याने 74 धावांची खेळी केली. त्यात त्याने 5 गगनचुंबी षटकार खेचले तर 7 चौकार ठोकले. त्यानंतर अखेरीस मिचेल सँटनर याने 13 बॉलमध्ये 25 धावा कुटल्या. तर पाकिस्तानकडून हॅरिस रौफने 3 विकेट्स काढल्या. प्रत्युत्तर देताना फकर जमान याने पाकिस्तानकडून 25 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली तर बाबरने 66 धावांची झुंज दिली. 


आणखी वाचा - IND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट!


न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी आणि बेन सियर्स.


पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन : शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), सैम अयुब, मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमेर जमाल, उसामा मीर, अब्बास आफ्रिदी आणि हरिस रौफ.