IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे ट्रेविस हेडच्य हातून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा कॅच सुटला होता. यावेळी चिटींग करून रोहितला माघारी धाडण्यात आलं होतं. यानंतर असा दावा करण्यात येतोय की, या प्रकारानंतर आयसीसीने वर्ल्डकप 2023 ची फायनल पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. 


दाव्यांमध्ये किती तथ्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का? या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.


वर्ल्डकप 2023 चा फायनल सामना पुन्हा खेळवण्यात येणार असल्याचे सर्व दावे खोटे आहेत. आयसीसीने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा घेऊ शकत नाही. मुख्य म्हणजे आयसीसीनेच ट्रेव्हिस हेडने घेतलेल्या रोहित शर्माच्या कॅचचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ट्रेव्हिसने स्पष्टपणे कॅच पकडल्याचं दिसून येतंय. याचाच अर्थ रोहित शर्माच्या विकेटमध्ये कोणतीही चिटींग झाली नव्हती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे चिटींगमळे जर एखादा टीम सामना जिंकली तरीही सामन्याच्या निकालावर फारसा फरक पडला नसता. त्यामुळे पुन्हा फायनल सामना आयोजित करण्याचा प्रश्न येत नाही. 


एकेकाळी अर्जेंटिनाचा महान दिग्गज डिएगो मॅराडोना यांनी हाताने गोल करून फिफा वर्ल्डकप जिंकला होता. हा सामना देखील फिफाचा फायनल सामना होता. मॅरेडोना यांचं कृत्य माहिती असून देखील वर्ल्डकपची फायनल पुन्हा खेळवण्यात आली नव्हती. 


का केले जातात अशा पद्धतीचे दावे?


यूट्यूब असो इंस्टाग्राम असो किंवा इंतर सोशल मीडियावर जे युझर्स दावा करताय आहेत की, वर्ल्डकप 2023 ची अंतिम फेरी पुन्हा होणार आहे, त्यांना केवळ क्रिकेट चाहत्यांना गोंधळात टाकायचं आहे. हे युझर्स फेक न्यूज चॅनेलची नावं वापरून असे खोटे दावे करतात. जेणेकरून त्यांना अधिक लाइक्स, शेअर्स मिळून त्यांच्या सोशल मीडियाचं प्रमोशन होईल.