नवी दिल्ली : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी -20 मालिका सुरू आहे. पाकिस्तानने 7 गडी राखून पहिल्या सामन्यात विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज फहीम अश्रफने मोठी कामगिरी केली आहे. पाकिस्तानकडून टी-20 सामन्यात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19व्या षटकात शेवटच्या तीन चेंडूत फहीमने आपली हॅट्रिक पूर्ण केली. चौथ्या बॉलवर त्याने इसुरु उदाणा, पाचव्या बॉलवर महिला उदेवते आणि अखेरच्या बॉलवर दसन शनाकाला आऊट केलं.


पाकिस्तानकडून टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा अशरफ पहिला गोलंदाज बनला आहे. पाकिस्तानने टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 गडी राखून जिंकला. मालिकेचा दुसरा सामना 29 ऑक्टोबरला लाहोर येथे होणार आहे.