Vasu Paranjape Death | ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन
वासूदेव परांजपे (Vasudeo Paranjape) यांनी वयाच्या 82 वर्षी जगाचा निरोप घेतला.
मुंबई : भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य अशी ओळख असलेले ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वासूदेव परांजपे (Vasudeo Paranjape) यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 82 वर्षी जगाचा निरोप घेतला. यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. एकसेएक स्टार खेळाडू घडवण्यात परांजपे यांचं मोलाचा वाटा होता. परांजपे यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड या आणि अनेक दिग्गज खेळाडूंना घडवण्यात मोठा वाटा उचलला.(famous cricketer and coach Vasudeo Jagannath Paranjape passed away at age of 82)
क्रिकेट कारकिर्द
वासूदेव परांजपे यांनी 29 प्रथम श्रेणी सामन्यात मुंबई आणि बडोद्याचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यांनी 40 डावांमध्ये प्रत्येकी 2 शतक आणि अर्धशतकांच्या मदतीने 785 धावा केल्या. 127 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. या व्यतिरिक्त त्यांनी 9 विकेट्सही घेतल्या होत्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हा कोचिंगकडे वळवला. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे क्रिकेटसाठी वाहिलं.