मुंबई: कोणत्याही खेळात पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो आणि खेळ हा मैदानात तिथेच संपतो. मात्र चाहत्यांसाठी खेळ म्हणजे एक वेगळीच प्रेम असतं. या खेळात झालेला पराभव सहन करू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा अडचणीचे प्रसंग ओढवतात असा प्रकार मैदानात घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या एजबेस्टन इथे असाच प्रकार घडला. संघाचा पराभव पत्करणं कठीण झाल्यानं चाहत्यांनी बियर पिऊन मैदानात तुफान धिंगाणा घातला. एजबॅस्टन येथे क्रिकेट सामन्यादरम्यान काही चाहत्यांना त्यांच्या संघाचा पराभव सहन करता आला नाही आणि मोठ्या संख्येने लोकांनी मैदानात उतरून धुमाकूळ घातला.


बर्मिंघम बीयर्स आणि डर्बीशायर व्हिटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेचा सामना खेळला जात होता. त्यानंतरच बर्मिंघम बीयर्स संघाचा पराभव पाहून चाहत्यांना ते सहन करता आलं नाही आणि हजारो लोकांनी मैदानातच प्रवेश केला. या दरम्यान कोरोना नियमांचंही मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं.



हा सामना पाहण्यासाठी नागरिकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून परवानगी दिली होती. मात्र या नियमांचं उल्लंघन नागरिकांनी केलं आहे. बर्मिंघम मेलनं दिलेल्या माहितीनुसार हजारो विद्यार्थी यामध्ये उपस्थित होते. चाहत्यांनी खेळ सोडून मैदानात तुफान राडाच केल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकच नाही तर मैदानात बियर पिऊन धिंगाणाही घातला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.